सिनेस्टाईल पाठलाग करत तीन खंडणी बहाद्दराना पकडले

पूर्णा : शहरातील आनंद नगर परिसरातील एका विधिज्ञांना ४५ लाख रूपयांची खंडणी द्या अन्यथा मुलाला जिवे मारू अशी धमकी दि.११ जून रोजी देण्यात आली होती. या घटनेने संबंधीत कुटुंब भयभीत झाले होते. याबद्दल पूर्णा पोलिसांना माहिती देताच त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कावलगांव परिसरात ३ खंडणी बहाद्दरांना पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुर्णा शहरातील आनंद नगर येथील अ‍ॅड. जि. एन. डाखोरे यांच्या घराच्या गेटला दि. ६ जून रोजी त्यांचा मुलगा प्रसादच्या नावाने लाल, निळ्या व काळ्या अक्षरांत ४५ लाख ५५ हजार रुपये रोख द्या, अन्यथा जीवे मारू अशी उघड धमकी देण्यात आली. होती. मागणी केलेली रक्कम दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड रोडवरील चुडावा-बसमत फाटा परिसरात आणण्याचे निर्देश दिले होते. पैसे न दिल्यास ११ दिवसांत किंवा ११ महिन्यांत तुझी लाश पडेल, अशा थरारक शब्दांत धमकी देण्यात आल्याने डाखोरे कुटुंब भयभीत झाले होते. प्रसाद यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितल्यानंतर सुरुवातीला कुणीतरी मानसिक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, धमकीत दिलेली नमूद तारीख जवळ आल्याने कुटुंबीयांनी अखेर पुर्णा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी प्रसाद यांना चुडावा (वसमत फाटा) येथे पाठविले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास (एमएच २६ बीएक्स ६१७२) क्रमांकाची पांढ-या रंगाची आय-२० कार प्रसाद यांच्या जवळ आली. कारमधील एका इसमाने प्रसाद यांना गाडीत बसण्याचा इशारा केला. प्रसाद गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असतानाच संशय आल्याने आरोपींनी कार भरधाव वेगाने चुडाव्याकडे पळविली. यावेळी पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरु करत कावलगाव परिसरात संबंधित कार अडवून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे तन्मय तुळशीराम पाचकोर (रा. सुरवाडी, सध्या आनंद नगर, पुर्णा), केदार अशोक घवाड (रा. कानडखेड) आणि युवराज प्रकाश कदम (रा. रुंज) अशी सांगितली.

आरोपींनी असा रचला खंडणीचा कट
मुख्य आरोपी तन्मय याने चौकशीत धक्कादायक कबुली दिली. तन्मय व केदार घवाड हे नांदेड येथील एका खासगी मोबाइल अ‍ॅप लोन कंपनीत वसुलीचे काम करीत असल्याने त्यांना पैशांच्या व्यवहाराची माहिती होती. प्रसाद डाखोरे यांचे वडील वकील असल्याने त्यांच्याकडे मोठी रक्कम असावी, असा अंदाज बांधून खंडणी उकळण्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली. धमकीची चिठ्ठी केदार याने लिहून डाखोरे यांच्या घराच्या गेटला लावल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पुर्णा पोलिसांनी खंडणी, धमकी व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51

Latest news