23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडाहैदराबादची विक्रमी धावसंख्या, शानदार विजयी

हैदराबादची विक्रमी धावसंख्या, शानदार विजयी

हैदराबाद : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने मुंबईचा ३१ धावांनी पराभव केला. हैदराबादने प्रथम फंलदाजी करत २७७ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने २० षटकात २४६ धावा केल्या. हैदराबादकडून हेन्री क्लासेनने सर्वाधिक ८० धावा केल्या तर गोलंदाजीत पॅट कमिन्सने ४ षटकात ३५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मुंबईकडून तिलक वर्माने ६४ तर टीम डेव्हिडने नाबाद ४२ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यांनी मुंबईविरूद्ध १५ व्या षटकातच २०० धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर क्लासेनने ३४ चेंडूत नाबाद ८० धावा ठोकत हैदराबादला २७७ धावांपर्यंत पोहोचवले. ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनेही जोरदार फटकेबाजी करीत आव्हान मोडित काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विकेट पडत गेल्याने मुंबईचा ३१ धावांनी पराभव झाला.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना असा चोप दिला, ज्याचा कोणी कधीच विचार केला नसेल. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी केलेल्या झंजावाती अर्धशतकांच्या जोरावर हैदारबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. हैदराबादने २० षटकात ३ बाद २७७ धावांचा डोंगर उभा केला. त्यांनी रॉयस चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या २६३ धावांचा विक्रम मागे टाकला.

हैदराबादविरुद्धच्या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी पहिल्या षटकात ७, हार्दिकने टाकलेल्या दुस-या ओव्हरमध्ये ११ धावा करत गोलंदाजांची धुलाई सुरु केली. त्यांनी ४ षटकात ४५ धावा केल्या. पाचव्या षटकात मुंबईला पहिले यश मिळाले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात करीत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR