१०४ अधिकारी, कर्मचा-यांनी केले रक्तदान

औसा : प्रतिनिधी
जिंदल समूहाचे संस्थापक कै. ओ. पी. जिंदल यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त जे.एस.डब्ल्यू. एनर्जीच्या वतीने तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर व मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) लातूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत थॅलेसिमिया, हिमोफिलिया, अ‍ॅनिमिया, अपघाती इ. रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी एकूण १०४ अधिकारी आणि कर्मचा-यांनी रक्तदान केले, यात लातूर येथे ३२, उमरगा २८, नांदेड १७, सोलापूर १५ आणि जालना मधील १२ सदस्यांचा सहभाग आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कै. श्री ओ. पी. जिंदल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी जे.एस.डब्ल्यू. एनर्जीचे तुषार पांडे, प्रितम गोरे, कु. निदा सोलकर, कु. अमृता राठोड, जनार्दन गुप्ता, संदेश घाटकर, समीर माथूर, परशुराम पाटील,  अनिल पिसाळ तसेच मुख्यमंत्री  सहायता निधी कक्षाचे सिद्धेश्वर  चौधरी तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. माधुरी मस्के, डॉ. राजश्री मिटकरे, धोंडीबा गोबाडे, अतिश मस्के आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्ण, अपघातग्रस्त तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी या वैद्यकीय महाविद्यालयात दररोज अधिकाधिक रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. संकलित रक्त शासनाच्या रक्तपेढीमार्फत गरजू रुग्णांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त करीत रक्तदात्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सिद्धेश्वर चौधरी यांनी सध्याच्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर जे.एस.डब्ल्यूने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news