२८ ऑगस्टच्या आत निर्णय घ्या, आता सुटी नाही

बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून सुरू होणा-या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट आणि निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता मराठा समाजाला गोड बोलून फसवण्याचे दिवस संपले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या वारंवार शिष्टमंडळे पाठवण्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली: सरकारचे शिष्टमंडळ आल्यावर काय बोलते ते पाहू. मात्र, मराठा समाजाला आणखी किती दिवस वेड्यात काढणार आहात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे. प्रत्येक वेळी फक्त चर्चेला यायचे आणि वेळ मागायचा, हे आता चालणार नाही. गेल्या 3 वर्षांत जी जी सरकारे आली, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही सन्मान ठेवला. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी चर्चा करत आहे.

नोंदी आणि गॅझेटची अंमलबजावणी करावीच लागेल
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे दाखले आणि हक्क सरकारला द्यावेच लागतील. हे सरकार आता अडवू शकत नाही. तसेच यासंदर्भातील गॅझेट लागू करावेच लागेल, हे आता सरकारच्याही लक्षात आले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने २८ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला नाही, तर २९ ऑगस्टपासून नियोजित आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

छगन भुजबळांवरही जरांगेंचा निशाणा
दरम्यान, जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींचा आधार आणि त्यामागील घटनात्मक तरतुदी भुजबळ यांच्या लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला विरोध करत राहिल्यास त्याचे राजकीय नुकसान होऊ शकते, अशी जाणीव भुजबळांना झाल्याचेही जरांगे म्हणाले. ‘‘मराठ्यांना विरोध करून आपला काही फायदा नाही, अन्यथा अस्तित्व उद्ध्वस्त होईल,’’ असा दावा त्यांनी केला.

भुजबळ म्हणाले होते, ‘सरकार चर्चेतून मार्ग काढेल’
मनोज जरांगे यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्यही महत्त्वाचे ठरत आहे. भुजबळ यांनी यापूर्वी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना, जरांगे यांची लढाई आपल्या विरोधात नसल्याचे म्हटले होते. सरकार या विषयावर चर्चा करून निर्णय घेईल, असे भुजबळ यांनी सांगितले होते. ओबीसी समाजातील जातींची संख्या आणि जातगणनेच्या मागणीवरही सरकार काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news