20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार हेच महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

अजित पवार हेच महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

निकालाआधी राज्यात पोस्टरबाजीचा धुमाकूळ

बारामती : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांमध्ये उत्साह आहेच त्याचबरोबर धाकधूक देखील आहे. निकालापूर्वीच राज्यामध्ये अनेक नेत्यांचे विजयी पोस्टर दिसत आहेत. पण सध्या अजित पवार यांच्या एका पोस्टरची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी उमेदवारांचे विजयाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. आता अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांचे अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. पण त्याचबरोबर अजित पवार यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन असा देखील आशय पोस्टरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील आणि बारामतीमध्ये अजित पवार यांचे विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रशांत शरद बारवकर मित्रपरिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही पोस्टरवर अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्याचा देखील उल्लेख केला आहे. यावरून चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR