Homeलातूरआमदार अमित देशमुख यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी

आमदार अमित देशमुख यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. ९ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांची निवेदने व निमंत्रनाचा स्वीकार करीत पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना केल्या.
यावेळी श्रीशैल उटगे, सईताई गोरे, ट्वेन्टी वन शुगर्स व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विजयकुमार साबदे, अ‍ॅड. किरण जाधव, सुनील बसपुरे, अ‍ॅड. समद पटेल, प्रा. सुधीर अनवले, संतोष देशमुख, प्रकाश मिरगे, शिवम उटगे, उपसरपंच गोविंद देशमुख, पृथ्वीराज देशमुख, भुषण पाटील, प्रदीप तीकटे, अमोल धावणे, उमेद अभियानाच्या सीमा कांबळे, सुभद्रा काकडे, मीनाक्षी चाबुकस्वार, सावित्री बोयने, कलावती  अवघडे, सायरा पठाण, शोभा ओहोळ, अनिता कांबळे, विजय धुमाळ, विजय गायकवाड, रामदास पवार, चांददपाशा इनामदार, प्रा. भालचंद्र येडवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, संस्था संघटना पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR