इराण पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर?

तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका पुन्हा हवाई हल्ले करू शकते, असे संकेत वृत्तांमधून मिळत आहेत. पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढल्यामुळे ट्रम्प यांच्या प्रमुख सल्लागारांनी लष्करी तयारी सुरू केली आहे. ट्रम्प नुकतेच बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन चीन दौ-यावरून परतले आहेत.

जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आणि मोठा संघर्ष टाळण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करत आहेत. मात्र, ट्रम्प इराणच्या ताज्या शांतता प्रस्तावामुळे प्रभावित झालेले नाहीत. बीजिंगहून परतताना एअर फोर्स वन विमानामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘मी तो प्रस्ताव पाहिला, जर मला त्याचे पहिले वाक्य आवडले नाही, तर मी तो थेट फेकून देतो.

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील चर्चेनंतर लगेचच हा तणाव वाढला आहे. चीन हा इराणचा महत्त्वाचा मित्रदेश असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणा-या तेल पुरवठ्यावर तो मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत इराणबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. मात्र आपण चीनला तेहरानवर दबाव आणण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

पडद्यामागे पेंटागॉन (अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय) सर्व संभाव्य परिस्थितींसाठी तयारी करत आहे. गेल्या महिन्यातील युद्धविश्रामानंतर, अमेरिकन लष्करी नियोजक ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. युद्धविरामानंतर अमेरिका आणि इस्रायली सैन्याने आतापर्यंतची सर्वांत मोठी संयुक्त लष्करी तयारी सुरू केल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर मध्य पूर्वेतील दोन अधिका-यांनी सांगितले की, हे संभाव्य हल्ले पुढील आठवड्यापासून सुरू होऊ शकतात.

इराणकडे ‘अण्वस्त्रे असू नयेत’ यावर चीनचीही सहमती
ट्रम्प म्हणाले की, इराणला अण्वस्त्रे विकसित करू दिली जाऊ नयेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली पाहिजे, यावर अमेरिका आणि चीन दोन्ही देशांचे एकमत आहे. ट्रम्प म्हणाले, ‘‘मला त्यांच्याबद्दल (शी जिनपिंग) खूप आदर आहे. इराणबाबत त्यांचे मत ठाम आहे की त्यांच्याकडे अण्वस्त्र असू शकत नाही, त्यांनी हे अत्यंत ठामपणे सांगितले. तसेच त्यांनी (इराणने) हा जलमार्ग खुला करावा अशी त्यांची इच्छा आहे. पण ते म्हणतात त्याप्रमाणे, जर त्यांनी तो बंद केला तर तुम्ही त्यांना बंद पाडता. आणि हे खरे आहे, स्ट्रेटवर आमचे (अमेरिकेचे) नियंत्रण आहे. इराणने गेल्या अडीच आठवड्यात कोणताही व्यापार केलेला नाही, जो दररोज अंदाजे ५०० दशलक्ष डॉलर्सचा असतो.’’

तैवानचा मुद्दा राहिला अग्रस्थानी
या शिखर परिषदेत तैवान हा सर्वांत संवेदनशील मुद्दा राहिला. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेनुसार, शी जिनपिंग यांनी वैयक्तिकरीत्या ट्रम्प यांना चेतावणी दिली की, तैवानवरील मतभेदांमुळे अमेरिका आणि चीनमध्ये थेट संघर्ष होऊ शकतो. चीन या स्वशासित बेटाला आपलाच भाग मानतो, तर तैवान स्वत:ला बीजिंगपासून स्वतंत्र मानतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING : वाशीत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
01:03
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07

Latest news