उद्या २३४ केंद्रांवर ३८ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणा-या ३७ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची रविवार दि. २६ एप्रिल रोजी २३४ केंद्रावर दोन सत्रा मध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले असून शिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावरून परीक्षेच्या संदर्भाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी ची परीक्षा घेतली जाते. लातूर जिल्हयातील १ हजार ९४१ शाळांनी इयत्ता ४ थी च्या २१ हजार २२३ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरले आहेत. या विद्यार्थ्यांची जिल्हयातील १३१ केंद्रावर रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी १ हजार ३५१ हॉल निश्चित करण्यात आले आहेत. तसेच इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती  परीक्षेसाठी १६ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी  आवेदनपत्र भरले आहेत. या विद्यार्थ्यांची रविवारीलातूर जिल्हयातील १०३ परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी १ हजार २७ हॉल निश्चित करण्यात आले  आहेत.
दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दि. २६ एप्रिल रोजी दोन सत्रामध्ये पार पडणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रथम भाषा व गणित विषयाची १५० मार्काची परीक्षा होणार आहे. तर दुस-या सत्रात दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा व बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची १५० मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीही पूर्ण केली आहे. इयत्ता ४ थी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होणा-या विद्यार्थ्यास सलग तीन वर्ष ५ हजार रूपये शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळणार आहे. तर इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होणा-या विद्यार्थ्यास सलग तीन वर्ष ७ हजार ५०० रूपये शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news