एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून तयार केले जाणारे बनावट फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ अर्थात डीपफेकचा वाढता धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. १० फेब्रुवारी २०२६ रोजी आयटी नियमांमध्ये करण्यात आलेला बदल केंद्र सरकारने आता लागू केला.
केंद्र सरकारच्या या नव्या नियमानुसार आता कोणत्याही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह एआय कंटेंटवर अवघ्या ३ तासांच्या आत कारवाई करून तो सोशल मीडियावरून हटवणे कंपन्यांसाठी बंधनकारक असणार आहे. जर कोणी एआयच्या मदतीने फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओ कंटेंट तयार करत असेल आणि तो कायदेशीरदृष्ट्या स्वीकारार्ह असेल तर त्यावर हा कंटेंट एआयद्वारे तयार केला आहे, असा स्पष्ट लेबल लावणे बंधनकारक असेल. याशिवाय त्या कंटेंटसोबत तांत्रिक डेटा म्हणजेच मेटा डेटा समाविष्ट करावा लागेल. जेणेकरून त्याची मूळ ओळख पटवणे शक्य होईल. नागरिकांची फसवणूक टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कोणाचीही बनावट ओळख निर्माण करणे किंवा डीपफेक व्हिडीओ किंवा ऑडिओ बनवणे, परवानगीशिवाय कोणाचेही खाजगी फोटो अथवा व्हिडीओ प्रसारित करणे, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट, दिशाभूल करणारी, खोटी माहिती आणि अफवा पसरवणारे कंटेट, देशाची सुरक्षा किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारा मजकूर, असेल कोणत्याही परिस्थितीत ते खपवून घेतले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकार एआयच्या विकासाला रोखत नसून त्याचा जबाबदार वापर सुनिश्चित करत आहे. इंडिया एआय मिशन अंतर्गत आयआयटी जोधपूर, आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूर या संस्थांमध्ये डीपफेक ओळखणारे प्रगत तंत्रज्ञान विकसित केले जात आहे, असेही सांगण्यात आले.

आता ३ तासांत कारवाई
केंद्र सरकारने कंटेंट हटवण्याच्या कालावधीत सर्वात मोठा बदल केला आहे. न्यायालय किंवा सरकारकडून एखादा बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश मिळाल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना तो कंटेंट हटवण्यासाठी आधी मिळणारा ३६ तासांचा अवधी आता रद्द करण्यात आला आहे. आता केवळ ३ तासांत व्हीडीओ हटवावा लागेल. अश्लीलता, बनावट ओळख किंवा वैयक्तिक फोटोंचा गैरवापर यांसारख्या गंभीर तक्रारींवर अतिशय जलद गतीने कारवाई करावी लागेल.

नियम न पाळल्यास गुन्हे
सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना केवळ तक्रारीची वाट न पाहता एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असा बेकायदेशीर कंटेंट स्वत:हून रोखण्याचे निर्देश दिले आहेत. जर एखाद्या कंपनीने या एआय नियमांचे उल्लंघन केले तर एआय कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण काढून घेतले जाईल. याचा अर्थ त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गुन्ह्यात थेट भागीदार मानून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news