भेटा : वार्ताहर
औसा तालुक्यातील भेटा गावाजवळील धाराशिव जिल्ह्यातील कोंड या गावी एम एच १४. बी टी १८२१ औसा-मुरुड या एसटी बसचा पाटा तुटल्याने बस एका बाजूने घसरून बाजूच्या खडयात गेली. सुदैवाने बसमधील प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. वेळ सकाळची वेळ असल्याने आजुबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आली.
औसा आगाराची औसा मुरूड ही बस दोन तालुक्यांतून जाते. औसा तालुक्यातील भादा बोरगाव भेटा धाराशिव जिल्ह्यातील कोंड तावरजखेडा तसेच लातूर तालुक्यातील गुंफावाडी या गावावून पुढे मुरुडला पोहचते. प्रत्येक तासाला बसेस या मार्गावर धावत असतात. या मार्गावर रस्त्यावर खड्डे, अरूंद रस्ते, वाढलेली झाडेझुडपे असल्याने समोरुन येणा-या वाहनाला साईड देताना समोरासमोर आलेल्या दोन वाहनांना एक प्रकारे कसरत करावी लागते. या मार्गावर वाहण्याची संख्या वाढत आहे पण रस्ता खराब असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे औसा-मुरूड औसा या फेरीतून औसा आगारास चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळते हे विशेष म्हणावं लागेल.

