25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रकोयता गँगची दहशत; नऊ वाहनांची तोडफोड

कोयता गँगची दहशत; नऊ वाहनांची तोडफोड

पुणे : वानवडीतील भैरोबानाला परिसरात टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड करीत कोयते उगारून दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भैरोबानाला परिसरात सेंट पॅट्रिक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे.

गुुरुवारी दुपारी टोळी वस्तीत शिरली. त्यांच्याकडील कोयते आणि दांडके उगारून टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करून टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर मयुर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR