खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

अहिल्यानगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना ४ दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या सुधारली असल्याची माहिती समोर आली आहे. आता दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निलेश लंके यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली तब्येत चांगली असल्याची माहिती दिली होती. लंके यांनी म्हटले होते की, दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे माझी प्रकृती थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल.

निलेश लंके यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी आज नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांची तब्येत पूर्ववत होण्यासाठी समर्थकांनी काळारामाकडे साकडं घातलं. यावेळी दुग्धाभिषेकही करण्यात आला. तसेच आज बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी निलेश लंके यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोन दिवसांत लंके यांना रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे. दरम्यान, निलेश लंके हे अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news