जातीपातीच्या जिवावर मोठे होणा-यांचे भविष्य नाही;पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्यात विधान

बीड: प्रतिनिधी
जातीपातीच्या जिवावर जो राज्य करू इच्छितो, जो माणूस मोठा होऊ इच्छितो त्याला भविष्य नाही’, असे विधान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी दुष्काळाचा एकजुटीने मुकाबला करण्याचे आवाहनही उपस्थितांना केले. यावेळी त्यांनी फ्रान्समध्ये होत असलेल्या हिंसाचाराचे उदाहरण देत जेन झींबद्दल भाष्य केले.

दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही टीव्ही बघता की नाही, रिल्स बघता की नाही? पॅरिसची बातमी, फ्रान्स जळतोय. तिकडे इराणचे युद्ध, रशियाचे युद्ध; पण आपल्याला देशात अशी तरुण पिढी नको, ज्यांच्यामध्ये देशभक्ती. ज्यांच्यामध्ये देशाचा आदर नाही. त्यांच्या रक्तात देशभक्तीचे टॉनिक टाकण्याची गरज आहे. स्वत:चा देश आणि घर जाळून आंदोलन करणारे लोक नको आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत देशभक्ती रक्तात भिनवलेले सैनिक देशाला हवेत आहेत. तुम्ही जेन झी आहात. तुम्हाला जेन झींचे नेतृत्व करायचे तर दे मुद्यावरच होईल. गुद्याने होणार नाही.

संकट येत तेव्हा जातींच्या भिंती एका टिचकीमध्ये तुटून जातात. दुष्काळ श्रीमंत आणि गरिबावर वेगळा येत नाही. ऊन गरिबावर आणि श्रीमंतावर वेगळे पडत नाही. तहान गरीब आणि श्रीमंताला वेगळी लागत नाही. जनावरांचा चारा गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगळा लागत नाही , असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

या दुष्काळामध्ये जाती-धर्माच्या भिंती आम्हाला तोडायच्या आहेत. मी तोडल्या आहेत. मी अंतरवाली सराटी दत्तक घेतले आहे आणि मी अंतरवाली सराटीचा विकास करणार आहे. माझ्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावासारखे प्रेम अंतरवालीवर करणार आहे, असे भाष्य त्यांनी केले.
अजेंडा नसलेला माणूस विखारी दिशा देतो

पंकजा मुंडे म्हणाल्या की, जातीपातीच्या जिवावर जो राज्य करू इच्छितो, जो माणूस मोठा होऊ इच्छितो त्याला भविष्य नाही. कोणताही अजेंडा असलेला माणूस हा देशाला दिशा नाही देत. तो विचारी दिशा देत नाही, तो विषारी आणि विखारी दिशा देतो.

हाही दुष्काळ हाताळू. मी पर्यावरण मंत्री आहे. सीएसआरमधून प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, गुरांसाठी चारा पोहोचवण्यासाठी, शेतक-याला अनुदान मिळवून देण्यासाठी आमचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करून तुमची सावली बनण्याचे काम करेन, हे माझे वचन आहे, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57

Latest news