लातूर : प्रतिनिधी
जगामध्ये शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण असे ज्ञानाचे प्रकार आहेत. शालेय ज्ञान हे भौतिक साधनांची परिपुर्तता करते तर आध्यात्मिक ज्ञान हे मनुष्याचे वैचारिक आणि व्यक्तिमत्व उंचावते. ज्ञान हे माणसच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
पौष पौर्णिमेनिमित्त महाविहार, सातकर्णीनगर येथे आयोजित धम्मदेशना व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. भिक्खू पय्यानंद थेरो पुढे म्हणाले की, ज्ञान हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे. आजचे शालेय शिक्षण माणसाला कौशल्ये, रोजगार व भौतिक प्रगतीकडे घेऊन जाते; मात्र त्याला पूरक म्हणून आध्यात्मिक शिक्षणाची नितांत गरज आहे. आध्यात्मिक ज्ञानाशिवाय शालेय शिक्षण अपूर्ण ठरते, आध्यात्मिक शिक्षणामुळे मनुष्याला स्वत:कडे पाहण्याची दृष्टी मिळते. विचारांची शुद्धता, आचारातील संयम, करुणा, मैत्री आणि समत्व या मूल्यांची जोपासना आध्यात्मिक ज्ञानातूनच होते असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन व आभार प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले तर यशस्वीतेसाठी भंते बोधिराज, उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे, करण ओव्हाळ, सतीश मस्के, राजेश कदम, गौतम आदमाने, यशपाल मस्के, मिलिंद धावारे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रशांत जानराव, सत्यप्रकाश कांबळे, आम्रपाल बनसोडे, जयंत कांबळे, र्त्यंबक कवठेकर, मारोती सरवदे, अंतेश्वर थोटे, संतोष कसबे, आकाश सरवदे, राहुल शाक्यमुनी, निलेश बनसोडे, विशाल वाहुळे, उत्तम गायकवाड, विलास अवशंख, गौतम चिकाटे, वसंत वाघमारे, कृष्णा सुरवसे, गोविंद जोगदंड, शामल कांबळे, उज्वला सिरसाट, शोभा सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुरेखा दंडे, निर्मला थोटे, कविता कदम, सरिता बनसोडे, निर्मला गौरकर, कांता सरवदे, पंचशीला बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, पंचशीला बनसोडे, माया धावारे, यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर वकील, डॉक्टर, प्राध्यापक, विविध नगरातील महिला मंडळी यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती
होती.

