बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामतीमध्ये विमान लँडिंगच्या वेळी ही दुर्घटना झाली.
दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजितदादांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. यावेळी अजित पवारांच्या जवळ असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अश्रू अनावर झाले. अनिल देशमुख हे बारामतीकडे रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून ते राज्यातील सर्वच नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासह ५ जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
.

