25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरातील गोरेवाडा तलावात बुडून दोघांचा मृत्यू

नागपुरातील गोरेवाडा तलावात बुडून दोघांचा मृत्यू

नागपूर : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा गोरेवाडा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रचंड उकाडा असल्याने दोघेही पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. दारूच्या नशेत असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज घेता आला नाही. काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले आणि क्षणात दिसेनासे झाले. ही धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

सतीश रामराज देशभ्रतार (वय १८) आणि अनिकेत धनराज बडगे (वय १८, दोन्ही रा. मानवतानगर, टीव्ही टॉवर) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. ते मामेभाऊ-आतेभाऊ आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने पथकासह घटनास्थळी पोहोचले. मनपा अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा पेंटिंगचे काम करायचा. त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात. अनिकेत हा एका खाजगी रुग्णालयात काम करत होता. शनिवारी सकाळी दोघेही परिसरातच राहणारे मित्र साहिल कैलास चौरे (वय २१), यश आदेश उके (वय १७) आणि कुणाल सुधाकर उके (वय १३) यांच्यासोबत पार्टी करण्यासाठी गोरेवाडा तलाव परिसरात गेले होते. तलावाच्या काठावर सर्वांनी दारू प्यायली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR