निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप

बारामती : प्रतिनिधी
अजित पवार यांचे दुसरे पुत्र पार्थ पवार यांच्यावर कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणावरून होत असलेल्या आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर असे आरोप सुरू होतात. २००९ मध्ये ७० हजार कोटींचा आरोप झाला. त्यात काहीही निघाले नाही. पण बदनामी आमची होते. बारामतीकर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, मुंढवा जमीन व्यवहारात एक रुपयाचा व्यवहार न होता, फक्त आकडे लिहून कशी रजिस्ट्री होऊ शकते, याचे मलाही आश्चर्य वाटले. एफआयआर दाखल झाला आहे. सत्य लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चांवर आज अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मी आयुष्यात कधीही चुकीचे काम केले नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणावरही दबाव आणू नका. चुकीचे काम आजवर केले नाही आणि पुढेही करणार नाही. पवार म्हणाले की, मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. एक रुपया न भरता कागद कसा तयार झाला हे पाहून मी स्वत:ही आश्चर्यचकित झालो. नेमकं काय झालं हे लवकरच समोर येईल. पण निवडणुका स्जवळ आल्या की आरोपांची मालिका सुरू होते. आधीही आमच्यावर आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही. मात्र बदनामी होते.

जय पवार निवडणुकीत उतरणार नाही
जय पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे असा प्रश्न अजित पवारांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसे काही होणार नाही. असे म्हणत अजित पवारांनी जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news