काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरानंतर लेंडे नदीवरील नव्याने तयार झालेले हिमनदी सरोवर कधीही फुटू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. सरोवरातील पाण्याचा रंग गडद होत असून, ते वेगाने वाढत आहे. या स्फोटामुळे प्रति सेकंद ५०० घनमीटर पाणी वाहून मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार, चीनने ही माहिती सर्वात आधी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाशी शेअर केली आहे. पाण्याचा रंग सातत्याने गडद होत आहे. हा धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ सरोवर कधीही फुटण्याचे संकेत मिळत आहे, असे चीनने नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
या आठवड्यात नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडनंतर हे सरोवर तयार झाले आहे. ग्लेशियर तुटल्याने मोठा ढिगारा खाली आला. या प्रचंड ढिगा-यामुळे नदीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे एक नैसर्गिक बांध तयार झाला. त्याच्या मागे पाणी जमा होऊ लागल्याने मोठं सरोवर तयार झाले.
हे सरोवर चीनच्या जवळ चोचेन नदी आणि नेपाळच्या दिनेशने पुरेपू नदीच्या संगमावर बनले आहे. चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरोवरात पाण्याचा स्तर सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी यात आतापर्यंत सुमारे २५ लाख घन मीटर पाणी जमा झाले आहे. धोका पाहता चीनने खालच्या परिसरात राहणा-या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच ड्रोन आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.
एका रिपोर्ट नुसार, सरोवर फुटल्यानंतर किती परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी चीनने एक मॉडल तयार केले आहे. आकलनानुसार, अशा परिस्थितीत नदीच्या पात्रातून पाण्याचा कमाल प्रवाह प्रति सेकंद ५०० घनमीटरपर्यंत पोहोचू शकतो. जर नैसर्गिक बांधचा काही भाग जरी फुटला तरी पाणी नदीच्या किना-याच्या आतच राहील. म्हणजेच अचानक पाणी वाढू शकते. पण नदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू शकत नाही, असंही चीनचे एक आकलन आहे.
सरोवरचे पाणी नदीमधून वाहण्यास सुरुवात
चीनच्या मते, शुक्रवारी सरोवराचे पाणी लेंडे खोला आणि त्रिशूली नदीमधून वाहण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत निर्माण झालेला धोका हाताळण्यासारखा होता असे मानले गेले. तरीही नेपाळची चिंचा वाढलेली आहे. बुधवारी झालेल्या महापुरात आतापर्यंत ६२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. .
















