परभणी : तालुक्यातील पेडगाव येथे रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून गावातील वार्ड क्रमांक १ व २ आनंदनगर येथे फ्लेवर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा माजी उपसरपंच शेख सलमान अकबर नाना मुबीन कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या विकास कामामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरीश पठाण, बाळू खरात, निखिल मांडे, शेख फरान, विष्णू शेंद्रे, दीपक कुराडे सावळा कुराडे यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. आनंदनगर परिसरातील रस्त्यांची सुविधा अधिक चांगली व्हावी तसेच नागरिकांना ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने फ्लेवर ब्लॉकचे काम हाती घेण्यात आले आहे. या विकास कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना चांगली रस्ते सुविधा मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रक्षाबंधनाच्या शुभदिनी विकास कामाचा शुभारंभ झाल्याने आनंदनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















