भारताने आठव्यांदा पटकावला आशिया कप

भारतीय रणरागिनींचा सुवर्ण अध्याय, श्रीलंकेचा उडविला धुव्वा
दुबई : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. आशिया कप फायनल सामन्यात गतविजेत्या श्रीलंका संघावर ७२ धावांनी विजय मिळवत आशिया कपवर आठव्यांदा नाव कोरले.

दुबईच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्मा आणि स्मृती मंधानााने विक्रमी शतकी भागिदारी करीत श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजीत श्रीचरणी आणि दीप्तीसह भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर श्रीलंकन संघ सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे भारताचा मार्ग सुकर झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८३-५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने श्रीलंकेला १११ धावांवर ऑल आऊट केले.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात भारताने चौथ्यांदा आशिया कप जिंकला. याआधी ९ अंतिम सामन्यांपैकी भारताने तब्बल ७ वेळा विजेतेपदावर कब्जा केला होता तर दोन फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. २०१८ मध्ये बांगलादेशने भारताला अंतिम सामन्यात पराभूत केले तर २०२४ मध्ये श्रीलंकेने भारताचा स्वप्नभंग केला होता. मात्र, यंदा भारताने त्या पराभवाचा वचपा काढत दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने आशिया कपवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

अंतिम सामन्याआधी भारतीय महिला संघाने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली. साखळी फेरीत भारताने थायलंडचा ९४ धावांनी, हाँगकाँगचा १३७ धावांनी आणि पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने ग्रुप-अ मध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशला ४० धावांनी नमवत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताचा खेळ प्रभावी राहिला. या शानदार खेळीच्या जोरावर आशिया कपचे जेतेपद पटकावले.

टीम इंडियाची
विजयी सलामी
नवी दिल्ली : टीम इंडियाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा शानदार विजय झाला. अफगाणिस्तान संघाने दिलेल्या १५७ धावांचे आव्हान भारताने ७ गडी राखत सहज पूर्ण केले. सलामीवर अभिषेक शर्माची फटकेबाजी आणि इशान किशनची मिळालेली मोलाची साथ याच्या जोरावर अफगाणिस्तानचा ७ विकेट्सने पराभव झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news