मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात

अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनात झोकून देणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार (२९ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. या निमित्ताने शेकडो मराठा आंदोलन गावात दाखल झाले असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी आता विजयाच्या उंबरठ्यावर उभे असून मागे हटणार नाही, असे ठणकावून सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी १० आंदोलने केली होती. सरकार मागण्या मान्य करत असले तरी अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे संतप्त झालेले जरांगे पाटील यांनी पुन्हा आणि शेवटचे अस्त्र म्हणून उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने ५८ लाख नोंदी मान्य केल्या असल्या तरी त्यांना प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. शिवाय प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे आता माघार नाही. आरक्षणाची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे.

उपोषणाच्या सुरुवातीलाच जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे, आज गोडीने बोलतोय, उद्या बिघडू शकतो, असा इशाराही दिला. या निमित्ताने राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्यात आता या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्यांना व्हॅलिडिटी द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावे, चर्चेसाठी आलात तर स्वागत नाहीतर लढा सुरूच राहणार असा इशारा देतानाच आता आमच्याकडून वेळ देणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनो आता गाफील राहू नका, घरात बसून राहू नका. मी अन्नपाण्यावाचून उपोषणाला बसलोय. तुम्ही तातडीने अंतरवाली सराटीला या आणि अंतिम लढ्यास सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे. आता मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवणे बंद करावे असे आवाहन करतानाच मराठा समाजाला मोठे होऊ न देण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला.

आता संघर्ष केला तर मराठ्यांच्या पुढच्या पिढीचा फायदा होईल, असे स्पष्ट करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी बलिदान दिलेल्या मराठ्यांच्या कुटुंबाला नोकरी आणि मदत देण्याची मागणी केली. तसेच हे शेवटचे आंदोलन असून सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असे स्पष्ट केले. तसेच गाफिल राहिल्यास दगाफटका होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news