लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतक-यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी या कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत.
योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत शेतकरी असल्यास, त्याच्या वारसाची माहिती घेऊन कर्जखात्याचा वारस नोंदवावा. त्यानंतर पोर्टलवरील ‘वस्र’ङ्मं िऊीूीं२ी िअूूङ्म४ल्ल३२ सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी. बँकेने मयत शेतक-यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतक-यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना अनु क्रमांक. इफ-कऊ, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, अॅ१्रर३ंू‘ फीॅ्र२३१८, उकऋ, बचत खाते क्रमांक, ढअउ कऊ, ढअउर टीेुी१२ँ्रस्र ठ४ेुी१, छङ्मंल्ल अूूङ्म४ल्ल३ ठ४ेुी१ आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहिती देणे आवश्यक आहे.
एका इफ-कऊ अंतर्गत किमान एक आणि कमाल सहा कायदेशीर वारसांची नोंद करता येईल. प्रत्येक वारसाचा कर्जातील हिस्सा नोंदविणे आवश्यक आहे. सर्व वारसांच्या हिस्स्यांची एकूण बेरीज १०० टक्के असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक हिस्सा असल्यास प्रणाली नोंदणी स्वीकारणार नाही. माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित कर्जखात्याची आवश्यक तपासणी करावी. तसेच तक्रार निवारण स्थिती आणि ी-ङउ पडताळणीसह प्रणालीतील प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. माहिती सादर केल्यानंतर शासन निर्णयातील निकषांनुसार स्वयंचलित छाननी केली जाईल. वारस आयकरदाता आहे किंवा नाही, तसेच तो शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल. निकषांनुसार अपात्र आढळणा-या वारसांना योजनेच्या लाभासाठी अपात्र घोषित केले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित बँकांनी मयत शेतक-यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक कार्यवाही करून वारसांची माहिती पोर्टलवर अद्यावत करावी.
















