महाराष्ट्रातील २०० भाविक काठमांडूमध्ये अडकले; सरकारकडे मदतीची आर्त हाक

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध भागांतून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले तब्बल २०० भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडले आहेत. यात्रेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, परवानगी आणि प्रक्रिया पूर्ण करूनही चीनकडून व्हिसा मंजूर न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंनी वेळेत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. तसेच कैलास मानसरोवर यात्रेसाठी लागणारे परमिटही त्यांना मिळाले होते. मात्र, चिनी दूतावासाकडून अद्याप व्हिसा जारी करण्यात आलेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील सुमारे २०० भाविकांना काठमांडूमध्येच थांबावे लागत आहे. यामध्ये पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर भागांतील भाविकांचा समावेश आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अडकलेल्या भाविकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. भाविकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्तरावरही याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही भाविकांच्या नातेवाईकांनी मदतीची विनंती केली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही व्हिसा न मिळाल्याने यात्रेकरूंना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत बीजिंगमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून चीन सरकारशी आवश्यक समन्वय सुरू आहे. सोमवारी चिनी दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या काठमांडूमध्ये अडकलेले सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00

Latest news