समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात;  ५ जणांचा मृत्यू

अमरावती : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वॅगन आर कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वॅगन आर कार चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर १०५ च्या नजीक कारने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मृतांमध्ये एका चिमुरडीचा समावेश
या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि समृद्धी महामार्गाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह गाडीबाहेर काढून रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणावरून लातूरमध्ये एल्गार; ६ जुलैला भव्य मोर्चा!
10:13
Video thumbnail
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस;हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा अंदाज
04:03
Video thumbnail
Latur|अवैध दारू विक्री करणारा ढाबा संतप्त नागरिकांनी जाळला
04:42
Video thumbnail
Latur|उदगीर तालुक्यात समाधानकारक पाऊस; खरीप पेरणीला वेग
01:21
Video thumbnail
BREAKING : वाशीत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
01:03

Latest news