महिला बीएलओ असुरक्षित; घरोघरी भेटी देणे धोक्याचे?

मुंबई : घराची बेल वाजवल्यावर दरवाजा उघडून तो आपटणे, वरच्या आवाजात बोलणे, दुपारी या, घरात कोणी नाही, असे एसएमएस पाठवणे, घराच्या दरवाजावर उभ्या असलेल्या महिला बीएलओना घरात बसण्यास सांगून दार लावणे. आदी घटनांमुळे बीएलओ महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे घरोघरी भेटी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम सुरू असून या कामकाजासाठी सर्वाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात महिला शिक्षिका आहेत.
सकाळी शाळेतील जबाबदारी पार पाडून दुपारनंतर दिलेल्या परिसरात निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र वाटणे, एवढेच नाही तर ते पत्र मतदारांनी भरल्यानंतर पुन्हा जाऊन आणणे, त्यानंतर ते योग्यरीत्या भरले की नाही, याची खातरजमा करून ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. हे काम करत असताना महिला बीएलओना प्रत्येकाच्या घरोघरी किमान दोन ते तीन वेळा जावे लागत आहे. या भेटीदरम्यान अनेक महिला बीएलओना वाईट अनुभव आले आहेत.

काही इमारतींमध्ये महिला बीएलओना आत येण्यास बंदी घालण्यात येते. प्रवेश दिला तर सदनिकाधारकांची बोलणी ऐकावी लागतात. अनेकजण उंच आवाजात बोलत शिव्याही घालतात. एका मतदार संघात घरोघरी जाऊन हे काम करत असताना एका महिला बीएलओला चक्क घरात बसण्यास सांगितले.

घरात कुटुंबातील कोणीतरी असेल यामुळे फॉर्म कसा भरावा, हे समजून सांगण्यासाठी महिला बीएलओ घरात बसल्या. तर लगेच त्या घरातील व्यक्तीने दरवाजा लावला. त्यामुळे धोका लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता दरवाजा उघडून महिला कशीबशी बाहेर पडली.
या घटनेबद्दल महिला बीएलओने बीएलओच्या ग्रुपवर तक्रारही केली. आपल्या सहक-यांना झालेली घटना सांगितली. या अशा घटनांमुळे बीएलओ महिला शिक्षिका असुरक्षित असल्याचे स्पष्ट होते

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50

Latest news