शौचालयात आढळला नवजात बाळाचा मृतदेह

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील विलेपार्ले येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावरील ओपीडी परिसराजवळ असलेल्या शौचालयात एका नवजात मृत बालकाचा मृतदेह आढळून आल्याने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून मानवतेला काळिमा फासणा-या या कृत्यामागे नक्की कोण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कूपर रुग्णालयात काल सकाळी नेहमीप्रमाणे रुग्णांची मोठी गर्दी होती. तळमजल्यावरील ओपीडीजवळील शौचालयात एक महिला गेली असता, तिला कमोडमध्ये नवजात बालकाचा हात बाहेर आलेला दिसला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार पाहताच त्या महिलेने आरडाओरडा केला. यामुळे रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय कर्मचा-यांनी तात्काळ शौचालयाकडे धाव घेतली. विहिरी किंवा कचराकुंडीत नवजात अर्भक फेकल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र रुग्णालयाच्याच शौचालयात असा प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कूपर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जुहू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपास सुरू केला आहे. हे नवजात मृत बालक शौचालयात कोणी आणि कसे आणून टाकले, याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच काल ओपीडी परिसरात कोणकोणत्या संशयित महिला किंवा व्यक्ती फिरत होत्या, याची चौकशी केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news