मुंबईत लोकलचा खोळंबा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी थांबल्याने लोकल रेल्वे सेवा कोलमडली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. त्यातच पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा केवळ वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले. या प्रवाशांना वसईतच रात्र काढावी लागली.

वसई-विरार महापालिकेने संकटाच्या काळात वेळेत बचावकार्य केल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. बचाव पथकाने पूरग्रस्त भागात धाव घेत अडकलेल्या १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन आणखी ५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारकरांच्या अडचणी वाढल्या. पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा वसई स्थानकापर्यंत सुरू असल्याने नालासोपारा आणि विरारकडे जाणारे हजारो चाकरमानी वसई स्थानकात अडकून पडले आहेत. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवाही बंद आहे. तसेच पावसामुळे रिक्षा सेवा, एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांसमोर घरी पोहोचण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.

६ जिल्ह्यांत शाळा बंद
मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी अधिकृत सुटी जाहीर केली. तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई व सातारा या ५ तालुक्यांतील अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news