राज्यात दमदार पावसाची प्रतीक्षा ; शेतक-यांचे डोळे आभाळाकडे

पुणे : प्रतिनिधी
दमदार पावसाच्या प्रतीक्षेत राज्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या केवळ ८ टक्के अर्थात सुमारे ११ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुणे विभागात फक्त ३२,३६४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी मान्सूनने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे या तारखेपर्यंत गेल्या वर्षी ७६ लाख हेक्टर अर्थात सुमारे ५२ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या.

जून महिना संपला तरी राज्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. यंदा अवकाळी पावसाची हजेरीही तुरळकच राहिल्याने धूळ अर्थात मान्सूनपूर्व पेरणीचे प्रमाणही कमीच राहिले आहे. हमखास पावसाचे असलेले मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतक-यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १ कोटी ४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर इतके आहे. तर यंदा २९ जूनपर्यंत राज्यात १० लाख ९४ हजार ८०८ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ३ लाख २३ हजार ९६० हेक्टर क्षेत्र अमरावती विभागातील आहे. तर सर्वात कमी ५ हजार ७५८ हेक्टरवरील पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत. जिल्हानिहाय पेरणीचा विचार करता यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३८ हजार १७६ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर सोयाबीनची १ लाख १९ हजार तर कापसाची लागवड ७ लाख २६ हजार हेक्टरवर झाली आहे.

खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून शेतक-यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती यांसह पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण केली आहेत. काही शेतक-यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, आदी पिकांसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. काहींनी कर्ज काढून शेतीची तयारी केली असल्याने आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा शिल्लक राहिली आहे. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी लांबली आहे. विशेषत: सोयाबीन उत्पादक शेतकरी वेळेत पावसाची अपेक्षा बाळगून आहेत.

बदलत्या वातावरणामुळे संभ्रम
सकाळी उन्हाचा कडाका आणि दुपारी ढगाळ वातावरण, अशा बदलत्या हवामानाचा शेती नियोजनावर परिणाम होत आहे. लवकर पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीची कामे वेगाने मार्गी लागतील. त्यामुळे सध्या बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

राज्यातील खरीप पेरणीची स्थिती
खरीपाखालील सरासरी क्षेत्र – १.४४ कोटी हेक्टर
२९ जूनपर्यंत पूर्ण झालेली पेरणी – १०.९४ लाख हेक्टर
गेल्या वर्षी २९ जूनपर्यंत पेरणी – ७६.३० लाख हेक्टर

विभागनिहाय पेरण्या (क्षेत्र हेक्टरमध्ये)
कोकण – ५,७५८
पुणे – ३२,३६४
कोल्हापूर – ७१,९६८
लातूर – ८०,१२७
नागपूर – १,४७,२३७
छ. संभाजीनगर – १,६५,९३५
नाशिक – २,६७,४६१
अमरावती – ३,२३,९६०
एकूण – १०,९४,८०८

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news