राज्यात १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. १३ ते २० ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २० ते २७ ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

हवामान विभागाने हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि त्याला लागून असलेल्या बांगलादेशच्या आकाशात चक्राकार वारे वाहत आहेत. या कारणामुळे पुढील २४ तासांत पश्चिम बंगालची किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.

दरम्यान, पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मागील २४ तासांत ८२.५ मि.मी. पाऊस पडला आहे. तर या हंगामात एकूण ५ हजार १६ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला आहे.
ओडिशाच्या काही भागांत अतिशय मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळ, कर्नाटक (किनारपट्टी व दक्षिण भाग), पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news