लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाभळगाव येथे आदरांजली सभा 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते  विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील ‘विलासबाग’ येथे सार्वजनिक आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रसिद्ध व बहुआयामी गायिका सौ. वंदना कांबळे यांच्या भक्तिसंगीत आणि ‘संतवाणी’च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेत्याच्या दूरदूष्टीला व कार्याला उजाळा लोकनेते विलासराव देशमुख हे एक दूरदर्शी नेते आणि सच्चे लोकसेवक होते. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून त्यांनी पंचायत समितीचे उपसभापतीपद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रातील कॅबिनेट मंत्रीपद आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसपद अशा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्या. लोकशाहीच्या मूल्यांना प्राधान्य देणारे नेते होते. त्यांनी लोकशाही मार्गानेच राजकीय यश मिळवले. लोकशाहीमधील सत्तेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व दिले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हते तर समाजसेवेसाठी होते. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण, उदयोग, पायाभूत सुविधा, दळवळण, सिंचन, विज्ञान, तंत्रज्ञान, युवक, महिला, आदिवासी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या. विशेषत: ग्रामीण विकास आणि कृषि क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी काम केले. सामाजिक न्याय आणि समानता याला कायम प्राधान्य दिले. आजही त्यांना राजकारणातील दूरदृष्टी, अभ्यासूवृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले त्यांच्या या महान विचारकार्याला व स्मृतींना उजाळा देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका वंदना कांबळे  यांची विशेष स्वरसाधना या आदरांजली सभेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या गायिका सौ. वंदना कांबळे ‘संतवाणी’ आणि भक्तिसंगीत सादर करणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते आणि लावणी अशा विविध गीतप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news