वाढत्या तापमानामुळे सावरी येथे २ बैल दगावले

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील सावरी येथे उष्णतेची तीव्रता वाढल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. सावरी येथील शेतकरी मदन श्रीरंग भंडारे यांच्या मालकीचे दोन बैल शेतात शेतमेहनत करून बाधले असताना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक मृत अवस्थेत आढळले. संबंधित घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली.
    सकाळी बैलांकडून नांगरणीचे काम करून घेतल्यानंतर त्यांना झाडाखाली सावलीत बांधण्यात आले होते मात्र, दुपारच्या सुमारास पुन्हा कामासाठी वापर केल्यानंतर संध्याकाळी शेतात बांधून सदर शेतकरी गावाकडे गेला होता रात्री ९ वाजता शेताकडे आले असता बैल जमिनीवर कोसळलेल्या दिसून आले सदर बैलाचा मृत्यू वाढत्या उन्हामुळे त्यांना उष्माघात झाल्याचे समजते. या घटनेचा पंचनामा तलाठी बाळासाहेब मोहोळकर यांनी केला तर औराद शहाजानी येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी ठाकूर यांनी शवविच्छेदन केले आहे.
प्राथमिक माहितीप्रमाणे सदर बैलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजले. दरम्यान निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी बैल झाडाखाली सावलीस बांधावे पुरेसे पाणी पिण्यास द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  पंचांच्या मते, दोन्ही बैलांचा मृत्यू उष्णतेच्या झळांमुळे झाला असावा. मृत बैलांची एकूण अंदाजे किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news