वालूरच्या हेलिकलची दैन्यावस्था संपुष्टात; सेवावर्धिनी कडून बारवेचे पुनरूज्जीवन

सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या जतन व संवर्धनाचे काम सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले आहे. ही संस्था मराठवाड्यातील दुष्काळी भागात जलसंवर्धनाची कामे करणार असून वालूर येथील बारवांचे संवर्धन सुशोभिकरण हा त्याचाच एक भाग आहे. संवर्धनाचे काम तिन टप्प्यात होत असून बांधकामासाठी खास देगलूर येथून दगड मागविण्यात आला आहे.पहील्या टप्प्यातील काम जवळपास पुर्णत्वाकडे गेले आहे.

कुठलाही गवगवा न करता विकास कामाचा शुभारंभ गावचे सरपंच संजय साडेगांवकर, गणेशराव मुंडे,शैलेश तोष्णीवाल,मारोतराव बोडखे, वाल्मिक दराडे,गोपाळ अबूज,गणेशराव खरबे,बाजीराव बोडखे,राजेश साडेगांवकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.शिल्पकारांची टीम वालूरमध्ये दाखल झाली आहे.

संस्थेची कार्यपद्धती
१९९८ साली रास्व.संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या. ही संस्था समाजातील दुर्बल घटकांना सबल करून मुख्य प्रवाहात आणण्याचे कामे, समाजाच्या गरजेची कामे केली जातात. यातील कोणत्याही कामासाठी सेवावर्धिनी शासनाकडून व शासनाच्या कोणत्याही अभीकरणा कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यावर अशी कामे केली जातात.

राज्यातील १७ बारवाचा कायापालट
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिस-या जन्म शताब्दीच्या निमित्ताने अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्प सेवावर्धिनी राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे जतन संवर्धन करण्यात आले आहे. वालूरच्या निमित्ताने संस्थेने आपले कार्यक्षेत्र विस्तारित केले आहे.पोस्टखात्याने टपाल तिकिट काढून सन्मानित केलेल्या वालूरच्या बारदानी बारवेचेही कांम लागोलाग सुरू होणार आहे. हेलिकल स्टेपवेलचा लोकार्पण सोहळा दिवाळीपूर्वी पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांच्या उपस्थितीत होणार असून जलपूजन किशोरजी व्यास यांच्या हस्ते होणार आहे.

आणखी दोन गावांचे प्रस्ताव
परभणी तालुक्यातील आर्वी व सेलू तालुक्यातील रायपूर येथील प्राचिन बारवांच्या पुनर्निमार्णाचे प्रस्ताव संस्थेकडे दाखल करण्यात आले असून रायपूर येथील प्रस्तावाला संस्थेने मान्यता दिली असल्याची माहिती शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य तथा समन्वयक मल्हारिकांत देशमुख यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news