लोंबकळणा-या विद्युत तारांपासून नागरिकांना मिळाला दिलासा; नगरसेवक गौतम भोळे यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी

पूर्णा : शहरातील पंचशील नगरातील बंडू गायकवाड यांच्या घरासमोर मागील तब्बल १५ वर्षांपासून वीजेचा पोल नसल्याने विद्युत तारा अक्षरश: धोकादायक पद्धतीने खाली लोंबकळत होत्या. हाताला लागतील इतक्या खाली आलेल्या तारांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक गौतम भोळे यांनी घेतलेला पुढाकारामुळे लोंबकळणा-या तारांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या समस्येबाबत बंडू गायकवाड यांनी संबंधित विभागाकडे वारंवार लेखी अर्ज देत पाठपुरावा केला. मात्र अनेकवर्षे उलटूनही प्रश्न सुटला नाही. अखेर त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक भोळे यांच्याकडे आपली समस्या मांडली. नागरिकांची अडचण गांभीर्याने घेत भोळे यांनी स्वत: पुढाकार घेत महावितरण विभागाशी समन्वय साधला. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम अवघ्या ५ ते १० दिवसांतच मार्गी लावत दि. ८ ऑगस्ट रोजी नवीन वीज पोल बसवून घेतला. यामुळे केवळ गायकवाड यांच्या घरासमोरील समस्या दूर झाली नसून, संपूर्ण परिसरातील नागरिकांना धोकादायक लोंबकळणा-या विद्युत तारांपासून मोठा दिलासा मिळाला आहे. संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे ठरले आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करून दाखविल्याबद्दल नगरसेवक भोळे यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अल्पावधीत मार्गी लावल्याने त्यांच्या कर्तव्यतत्परतेचे आणि विकासकामांतील सक्रिय भूमिकेचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news