परभणी : जीएसटीच्या वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिका-यांनी दि. १० ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचारी-अधिका-यांनी दिला आहे. या आंदोलनास मुनिसिपल कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा परभणीले पाठिंबा दिला आहे.
यावेळी मुनिसिपल कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा परभणीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कांबळे, उपाध्यक्ष नजम खान नजीर खान, संतोष भारसाकर, सरचिटणीस मनोज गहलोत, चिटणीस ज्ञानोबा सुरवसे, विजयपाल काकडा, जिल्हा कोषाध्यक्ष शेख इस्माईल शेख हबीब, जिल्हा प्रवक्ता रोहित प्रधान, जिल्हा सल्लागार रॉकी बागडी, दादाराव राक्षे, शंकर कसबे, अब्दुल समद, महिला संघटक ज्योती मोरे, उपसंघटक वर्षा पेंडाळकर, ज्योती नाटकर, ज्योती वावळ, मार्गदर्शक शिवाजी अंबिलवादे, शेख मुख्तार शेख ताहेर, आसाराम शेळके, संजय भालेराव, जोगेंद्र काकडा, शेख सलीम शेख हबीब, शेख जुबेर शेख मौला, शरद कोल्हे आदींची उपस्थिती होती. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे
















