25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रविमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी

  मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार

पुणे : गुजरातच्या अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते.

मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हीडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहेत. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत.

सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल प्रशासनाला युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचे देखील कळतंय, हे अतिशय दु:खद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणा-या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणा-या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना पवार यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR