शेअर बाजार घसरला; युद्ध संपल्यानंतरही होतेय पडझड

मुंबई : प्रतिनिधी
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपल्यानंतर देशांतर्गत बाजारात चांगले दिवस येतील, अशी आशा गुंतवणूकदारांना होती. मात्र प्रत्यक्षात आज बाजारपेठेत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. शेअर बाजारात घसरणीचे वादळ आले असून सोन्या-चांदीचे दरही लक्षणीयरीत्या कोसळले आहेत.
शेअर बाजाराचा विचार केला तर गेल्या ५ दिवसांपासून देशांतर्गत बाजारात सुरू असलेल्या सलग तेजीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स ८०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ७६,५५७ च्या पातळीवर आला, तर निफ्टी देखील २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह २३,९३६ वर पोहोचला.

बाजार क्रॅश होण्यामागे जागतिक आयटी कंपनी ‘एक्सेन्चर’ने कमकुवत आऊटलुक जाहीर केल्यामुळे निर्माण झालेला दबाव मुख्य ठरला, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांसारख्या मोठ्या आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू केली. बाजार तज्ज्ञांच्या मते, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि गेल्या काही दिवसांतील तेजीनंतर झालेली नफावसुली हे बाजार घसरण्याचे दुसरे मोठे कारण आहे. याशिवाय जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय चिंतांनी देखील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमकुवत केला.

सोन्या-चांदीच्या किमतीतही घसरण
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते देशांतर्गत बाजारापर्यंत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५,३५० रुपयांच्या घसरणीसह १,४६,२४० रुपयांवर आली आहे, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम ८,८९९ रुपयांच्या घसरणीसह २,२८,७२१ रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.६ टक्क्यांनी घसरून ४,१८४.३३ डॉलर प्रति औन्सवर आले, तर ऑगस्ट डिलिव्हरीचे अमेरिकन गोल्ड फ्युचर्स १ टक्क्याने तुटून ४,२०२.१० डॉलरवर पोहोचले. तसेच स्पॉट सिल्वर १.५ टक्क्यांच्या घसरणीसह ६४.८३ डॉलर प्रति औन्सवर व्यवहार करत आहे.

डॉलर आणि फेडच्या भूमिकेचाही परिणाम
वैश्विक स्तरावर सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होत असून ते सलग तिस-या आठवड्यात घसरणीसह बंद होण्याच्या मार्गावर आहे. मजबूत डॉलर आणि फेडच्या कडक भूमिकेमुळे किमतींवर मोठा दबाव वाढला आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईबाबतची चिंता कमी झाली आहे, ज्याचा फटका बुलियन मार्केटला बसला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने बुधवारी आपले व्याजदर स्थिर ठेवलेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news