समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

नागपूर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरील मुंबई व नागपूर कॉरिडॉरवर दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत एकाच वेळी तीन गाड्यांना टार्गेट केले. रस्त्यावर धारदार वस्तू व खिळे फेकून लुटारूंनी श्रीकांत मिश्रा, पांडुरंग माने आणि मोहम्मद फरान यांच्या वाहनांचे टायर पंक्चा केले. वाहने थांबताच १० अज्ञात भामट्यांनी दगडफेक करत मिश्रा व माने यांच्याकडील मौल्यवान ऐवज बळजबरीने लुटला. तर अरिहन लानी यांनी गाडी न थांबवता पळ काढून स्वत:चा बचाव केला.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणा-या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना समोर येत आहेत. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, साहिल सतीश सोनवणे (वय २२) हे २६ ऑगस्ट रोजी नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. दुपारी सुमारे ४.१० वाजता मुंबई कॉरिडॉरमधील एक्सिट क्रमांक १८ जवळील टोलनाक्याच्या परिसरात त्यांची गाडी थांबवण्यात आली.

यावेळी एका सेल्टोस गाडीने त्यांची गाडी अडवली, तक्रारीनुसार, चार जणांनी सोनवणे यांच्या गाडीच्या दिशेने येत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. या झटापटीत सोन्याची चेन तुटून आरोपी ती घेऊन पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. हिसकावून नेलेल्या सोन्याच्या चेनची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news