34.2 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeमहाराष्ट्रहातपाय बांधून जवानाला विष पाजले

हातपाय बांधून जवानाला विष पाजले

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून चक्क हातपाय बांधून जवानाला विष पाजल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावामध्ये ही घटना घडली. जवानाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पत्नीसह अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुटीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाच्या बाबतीत असा प्रकार का घडला? याची संपूर्ण माहिती अद्याप कळू शकलेली नाही. हायपाय बांधून विष पाजल्यामुळे प्रकृती खराब झालेल्या या जवानावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR