29.1 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित?

अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित?

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. ३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या पात्र शेतक-­यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. गेल्यावर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी आणि पुराने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली होती. पण ती मदत तुटपुंजी असल्याची ओरड झाली होती. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता. तर आता सरकारने कर्जमाफी जाहीर करताना सप्टेंबरपासून ती लागू होणार आहे. म्हणजे त्यापूर्वी पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या योजनेपासून वंचित रहावे लागेल का, अशी चर्चा होत आहे. तर यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट २०२५ मधील शेतक-यांना कर्जमाफी मिळेल का, यावरून संभ्रम आहे. सरकारने याविषयी स्पष्ट भूमिका मांडावी अशी शेतकरी मागणी करत आहेत. अगोदर अस्मानी आणि नंतर सुलतानी संकटाने कोलमडल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त होत आहे. अतिवृष्टी आणि पुराने अनेक जिल्ह्यांतील नदीकाठचे शेतकरी उद्ध्वस्त झाले. त्यांनी यापूर्वी मिळालेली मदत तुटपुंजी असल्याने नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यावेळी महाराष्ट्र पिंजून काढत सरकारवर जहरी टीका केली होती. सरकारने सरसकट मदत केली नाही. त्यावरून नाराजी पसरली होती. तर आता कर्जमाफी योजनेतही या शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीची घोषणा शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या पात्र शेतक-­यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. तर नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. त्याचा शेतक-यांना मोठा फायदा होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR