24.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeराष्ट्रीयअधिकृत आधार केंद्राची माहिती आता गूगल मॅपवर

अधिकृत आधार केंद्राची माहिती आता गूगल मॅपवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अधिकृत आधार केंद्रांची माहिती आता गूगल मॅपवर पाहायला मिळणार आहे. आता जवळच्या आधार केंद्राचा पत्ता आणि उपलब्ध सेवा गुगल मॅपवर सापडतील. अधिकृत आधार केंद्रे गूगल मॅप्सवर प्रदर्शित करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि गूगलने भागीदारी केली आहे.

गूगल आणि यूआयडीएआयमधील सहकार्याच्या पुढील टप्प्यात यूआयडीएआय केंद्राची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि लोकांच्या अभिप्रायाला थेट प्रतिसाद देण्यासाठी गुगल व्यवसाय प्रोफाइलचा वापर करेल. भविष्यात भागिदारी गुगल नकाशे इंटरफेसद्वारे थेट अपॉइंटमेंट बुकिंग करता येईल. गूगल आणि यूआयडीएआय यांच्याकडून भागीदारी केल्यानंतर अधिकृत आधार केंद्र गूगल मॅपवर दिसतील. यामुळे देशभरातील नागरिकांना अधिकृत आधार केंद्रांची माहिती सहजपणे मिळेल.
यूआयडीएआयने आधार सेवांचा लाभ अधिक सोपा आणि जलद व्हावा, यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना त्यांच्या जवळचे अधिकृत आधार केंद्र थेट गूगल मॅप्सवर सहज शोधता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या पत्यावर भटकंती करण्याची गरज लागणार नाही. अनेकांना आधार नोंदणी किंवा दुरुस्ती सेवांसाठी योग्य केंद्र शोधताना अडचणी येत होत्या. काही वेळा एजंट किंवा फसवे केंद्र यांच्याकडे लोक पोहोचत होते.

मात्र, आता आधार केंद्रांकडून ज्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात, त्यानुसार आधार केंद्रांची माहिती गूगल मॅपवर दिसेल. लहान मुलांची नोंदणी, प्रौढ नागरिकांची नोंदणी, फक्त पत्ता अपडेट करणे, मोबाईल क्रमांक अपडेट करणे यानुसार माहिती गूगल मॅपवर दिसेल. दिव्यांगांच्या सोयींची उपलब्धता, इन्फ्रास्ट्रक्चर, पार्किंग सुविधा, कामाचे तास याबाबतची माहिती गूगल मॅपवर उपलब्ध असेल. याबाबतच्या सुविधा येत्या काही दिवसांत गुगल मॅपवर दिसतील.

गूगलसोबतच्या भागीदारीनंतर यूआयडीएआय आधार सेवा केंद्राची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि लोकांच्या कमेंटना थेट प्रतिसाद देण्यासाठी गूगल बिझनेस प्रोफाइलचा वापर करेल. या उपक्रमाचा उद्देश आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा अधिक सुलभ करणे, गूगल मॅप्सवर अधिकृत आधार केंद्राचा अचूक पत्ता, उपलब्ध सेवा, तसेच केंद्र सुरू आणि बंद होण्याची वेळ सविस्तर माहिती मिळणार आहे.

६० हजार आधार
सेवा केंद्रे गूगलवर
देशभरामधील ६० हजार आधार सेवा केंद्र गूगल मॅपवर असतील. गूगल मॅपवर जी आधार केंद्र दिसतील, ती अधिकृत केंद्रे असतील. गूगल मॅपवर अधिकृत आधार सेवा केंद्र आल्यानंतर नागरिकांना सुलभ, जलदगतीने आणि पारदर्शक सेवा मिळतील, असे यूआयडीआयचे सीईओ म्हणाले.

माहिती अपडेट
करणे होणार सोपे
युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने गूगलसोबत महत्त्वपूर्ण करार केल्याने आता देशातील सर्वच अधिकृत आधार केंद्र गूगल मॅप्सवर सहज शोधता येणार आहेत. यामुळे नागरिकांना जवळचे आधार केंद्र शोधणे, नवीन आधार बनवणे किंवा माहिती अपडेट करणे सोपे होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR