29.1 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमनोरंजनअभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर

अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे आपल्या हेल्थमुळे चर्चेत आली आहे. राजश्रीला ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले असून तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. राजश्री देशपांडेने हॉस्पिटलमधून फोटो शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आपले हेल्थ अपडेट तिने सांगितले आहे. सध्या राजश्रीची प्रकृती स्थिर आहे. फोटोंमध्ये ती सुंदर हसताना दिसत आहे.

राजश्रीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, राजश्रीला ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सर आहे. नियमित वैद्यकीय तपासणी दरम्यान राजश्रीला आपल्याला कर्करोग असल्याचे समजले. तसेच तिला योग्य वेळेवर हे समजल्यामुळे तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. ती म्हणाली की, खूप टेस्ट आणि शस्त्रक्रिया… ही एक रोलरकोस्टर राईड वाटली. पण माझ्यावर विश्वास ठेवा, सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याने मला त्यातून बाहेर काढले…शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई आणि वडिलांचे चेहरे पाहून माझी भीती पळून गेली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे, मी जगाला तोंड देण्यास तयार आहे असे मला वाटते. मी लवकर बरी होणार आहे आणि मला लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील मिळेल.

राजश्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार कमेंट्स करत आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. राजश्रीने २०१२ साली रिलीज झालेल्या ‘तलाश’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि ‘२४ : इंडिया’ सारख्या शोमध्ये दिसली. ‘किक’ मध्ये सहाय्यक भूमिकेने ती मोठ्या पडद्यावर परतली. ‘सेक्रेड गेम्स’ मधून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती ‘द स्काय इज पिंक’, ‘मॉम’, ‘मंटो’ आणि ‘जोराम’सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ‘द फेम गेम’, ‘ट्रायल बाय फायर’, ‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘रंगीन’ सारख्या बेव सीरिजमध्ये ती दिसली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR