35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरआंब्याची आवक आणि भावही सर्वाधिक

आंब्याची आवक आणि भावही सर्वाधिक

लातूर : प्रतिनिधी
फळांचा राजा आंबा हा शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आंध्रप्रदेशमधून येणारा बदाम आणि कर्नाटकमधून येणारा लालबाग हे दोन प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील फु्रट बाजार समितीमध्ये दररोज ५ हजार कॅरेट आंब्यांची आवक होत आहे तर दररोज १८०० ते १९०० कॅरेट आंब्यांची विक्री होत असल्याचे व्यापारी असलम बागवान यांनी सांगितले. सध्या आंब्याला चागला प्रतिसाद मिळत असून आणखी दहा दिवसांनी हा प्रतिसाद चांगलाच वाढण्याची शक्यता देखील व्यापा-यांनी व्यक्त्त केली आहे.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला सर्वाधिक महत्व दिले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक महत्वपुर्ण  मुहूर्त माणला जातो. या सणास बहुतांश लोक आमरस खाण्यास सुरूवात करतात.  एप्रिल महिन्याच्या मध्यतरी पासून आंबा बाजारपेठेत विक्रिला आला असला तरी बहुतांश लोक हे अक्षय्य तृतीया या सणापासून सर्वाधिक नागरीक आंबा खरेदी करतात. गेल्या काही दिवसापासून  शहरातील बाजारपेठेत विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. यात रत्नागीरी हापुस, कर्नाटक हापुस, केशर, लालाबाग, दशेरी, बदाम यासह गावरान आंबाही बाजारात दाखल झाला असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असणारा आंबा हा मे महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरातील फु्रट मार्केटमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात आंध्र प्रदेशामधून बदाम तर कर्नाटक मधून लालबाग आंब्याची आवक होत आहे. तसेच कैरीसाठी तोतापुरी आंबा देखील येत आहे. शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची देखील आवक असून पुढील काळामध्ये हापूस आणि केसर आंब्याची आवक देखील वाढणार असल्याचे व्यापारी असलम बागवाग यांनी सागीतले आहे. शहरातील विविध भागात फळ विके्रत्यानी आपली दुकाणे थाटली आहे. या दुकाणावर रत्नागीरी हापुस आंबा ५०० ते ६०० रुपये डझन, कर्नाटक हापूस आंबा २०० ते ३०० रुपये डझन, केशर आंबा १०० ते १५० रुपये किलो, लालबाग ८० रुपये किलो, रत्नागीरी देवगड हापूस आंबा ५०० ते ६००रुपये डझन, बदाम ५० ते ६० रुपये किलो, कलमी ८० रुपये किलो प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत असल्याचे व्यापारी वर्गाने सागीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR