35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूररेणापूर शहर, तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

रेणापूर शहर, तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर शहरासह तालुक्यात बेकायदा मटका, गुटखा ,जुगार, दारू, गुटखा, सावकारीसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात  ऊत आला असून या  अवैध धंद्याकडे पोलीसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे  तालुक्यात रेणापूर येथे  पोलीस ठाणे  व पानगाव येथे  पोलीस चौकी आहे\ शहरात पोलिस ठाणे असून नसल्या वाटत आहे. मटका व जुगार अड्डा यासह आदी चालणा-या  अवैद्य धंद्यांवर पोलिसांचा अंकुश नसल्याने रेणापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत मात्र पोलिस  बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे..  दारू,  मटका ,  गुटखा , वाळू हे  अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याची चर्चा सुरू आहे. गल्ली- बोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर सहज  मिळणारी दारू यामुळे तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या बरोबरच  बेकायदा  सावकारीचे तालुक्याला ग्रहणच लागले आहे.
हे सावकार मासिक १०  ते १५ टक्के आकारणी करून नागरिकांची लूट करीत आहेत. तसेच  आठवाडी सावकारी तर मोठ्या प्रमाणात फोफावली आहे  यामुळे अनेकांनचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे तेजीत असल्याचे चित्र आहे. शहरात शुक्रवारच्या  आठवडी  बाजारात भुरट्या चोरांची संख्या वाढली आहे. तसेच शहरातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.  या वाळूच्या धंद्यातून मोठी कमाई केली जात असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे मटका, गुटखा यासह अवैध धंदे बंद करण्यात यावेत  अशी मागणी नागरिकातून केली जात  आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR