26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeआरोग्यआईस्­क्रिममध्ये आढळला विषारी साप

आईस्­क्रिममध्ये आढळला विषारी साप

 

सध्या पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये अनेक चित्रविचित्र वस्­तू सापडत आहेत. आता एका आईस्­क्रिममध्ये चक्­क एक छोटा साप आढळला आहेत. एका चॉकलेट बार आईस्­क्रिममध्ये गोठलेल्­या अवस्­थेत हा साप होता. एका व्यक्­तिने फेसबुक पोस्­ट करत याचे फोटो शेअर केले आहेत. ‘फ्रि प्रेस जर्नल’ या वृत्तसंस्­थेने हे वृत्त दिले आहे.

थायलंडमधील रॅचबुरी विभागात ही खळबळजनक घटना घडली आहे. रेबॅन नॅकलेंबुन असे या फेसबुक युजर्सचे नाव आहे. ‘हे तुझे डोळे किती क्­यूट दिसतात. तु असा कसा मेलास? काळ्या बीन्ससारखा, पण हा फोटो खरा आहे कारण मी हे खरेदी केले आहे’ अशी पोस्­ट रेबॅन ने फोटोसोबत लिहीली आहे.

या व्यक्­तिने एका ‘ब्­लॅक बीन्स आईस्­क्रिम बार’ खरेदी केला होता. रॅपर उघडल्­यावर त्­याला धक्काच बसला आईस्­क्रिम बारमध्ये ब्­लॅक बिन्सबरोबर चक्­क छोटा साप दिसला. त्­याने या बारचे फोटो काढून तो फेसबूकवर शेअर केला व पोस्­ट शेअर करत आपल्­या भावना व्यक्­त केल्­या.

आईस्­क्रिमचे रॅपर उघडल्­यावर छोटा साप बारच्या टोकावर रुतून बसला होता त्­याचे डोळे थोडेसे बाहेर आले होते. त्­याने तो बार फेकून न देता त्­याचे फोटो काढले व सोशल मिडीयावर मित्रांना टाकत हा अतिशय धक्­कादायक अनुभव शेअर केला. हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आढळलेला साप हा विषारी

आईस्­क्रिमध्ये आढळलेला साप हा विषारी होता. काळे – पिवळे पट्टे असलेला हा साप आईस्­क्रिममध्ये दबला होता. ‘गोल्­डन ट्री’ स्­नेक या प्रजातीचा हा विषारी साप असल्­याची शक्­यता व्यक्­त केली जात आहे. त्­याच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. तर अशाच प्रकारची घटना २०२४ मध्येही समारे आली होती. तर मुंबईतही एका ऑनलाईन मागवलेल्­या केकमध्ये मानसाच्या हाताचे बोट आढळल्­याने खळबळ उडाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR