40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरजिल्ह्यातील १४४ प्रकल्पांत फक्त ५.५४ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांत फक्त ५.५४ टक्के पाणीसाठा

लातूर : प्रतिनिधी
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. प्रचंड ऊन असल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे भाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. अधिच जेमतेम पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमधील पाण्याचे भाष्पीभवन वेगाने होत असल्यामुळे प्रकल्पांतील पाण्याची पातळी तितक्याच वेगाने कमी होत चालली आहे. जिल्ह्यात दोन मोठे, आठ मध्यम तर १३४ लघू असे एकुण १४४ प्रकल्पांमध्ये फक्त ५.५४ टक्के पाणीसाठा आहे.  केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पात  टक्त २.२३ टक्के जीवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
येत्या पावसाळ्यापर्यंत मांजरा प्रकल्पातील पाणी पुरविता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनाची अंमलबजावणी काटेकोर झाली तर पाणीटंचाई भासणार नाही, अशी सद्याची परिस्थिती आहे.  लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात आता अत्यल्प जीवंत पाणीसाठा राहिला आहे. सध्या लातूर शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.  गेल्या महिन्यापासून हा बदल करण्यात आला आहे. मांजरा प्रकल्पात २.२३ टक्के म्हणजेच ३.९४६ दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. मृत आणि जीवंत पाणीसाठा मिळून ५१.०७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यातील ४७.१२३ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे.
मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत २.२६ टक्के, तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांत ४.६६ टक्के, १३४ लघू प्रकल्पांत ८.६७ टक्के असे एकुण १४४ प्रकल्पांत फक्त ५.५४ टक्के पाणीसाठा आहे.  पाण्याचा वापर काटकसरीने केला तर येत्या पावसाळ्यापर्यंत मांजरा प्रकल्पातील पाणी पुरु शकते. नागरिकांनी पाणी भारुन झाल्यानंतर नळाला तोटी लाववी, रस्त्यावर, गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करु नये, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा विभाग तत्पर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR