लातूर : प्रतिनिधी
येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. १७ जुलै रोजी शहरातील बार्शी रोड भागातील एम. जे. हॉस्पीटल या ठिकाणी असलेल्या डॉ. राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आई श्रीमती मीनाताई राठोड, पत्नी डॉ. प्रियांका राठोड व राठोड परिवाराची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला.
यावेळी लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शाह, ट्वेन्टी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटीव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल यांच्यासह राठोड कुटुंबीय उपस्थित होते.
















