37 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeलातूरआरटीईसाठी शाळांना नोंदणी अनिवार्य

आरटीईसाठी शाळांना नोंदणी अनिवार्य

लातूर : योगीराज पिसाळ
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व पात्र शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. १८ मार्च पर्यत शाळांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पूर्वी विनाअनुदानीत, स्वंयअर्थसहायी शाळांचा समावेश होता. मात्र या वर्षापासून प्रथमताच अनुदानित, खाजगी,  शासकीय शाळांचाही नोंदणीसाठी समावेश करण्यात आला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार महानगरपालिका शाळा, नगर पालिका/नगरपरिषद/नगर पंचायत शाळा, फैन्टीमेट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिका शाळा (अर्थसहायी), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खाजगी अनुदानिन, स्वंषअर्थसहाष्यीन शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता लातूर जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रीया दि. ६ मार्च पासून सुरू झाली ती १८ मार्च पर्यत चालणार आहे.
  गेल्यावर्षी लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी २०० स्वंय अर्थसहित शाळांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. या २०० शाळेतील १ हजार ६४८ जागेवर २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी प्रक्रीया राबविणयात आली. या प्रवेश प्रक्रीये दरम्यान १ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेशाचा लाभ घेतला. तर २१७ विद्यार्थ्यांनी सोयीचा प्रवेश न मिळाल्यामुळे मोफत प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR