30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरउन्हाने भाजीपाल्यांचे दर कडाडले 

उन्हाने भाजीपाल्यांचे दर कडाडले 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याबाहेरील पालेभाज्यांची आवक मंद गतीने होत आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात गेल्या पधरा दिवसांपासून वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण अधिक होत आहे.
त्यामुळे उष्णतेच्या लाटेची झळ सर्वसामान्यांना देखील बसत आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नागरीकांना उष्णतेसह आता महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करुन ठेवतात. पण सध्या तापमानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतक-यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांवर उष्णतेचे संकट घोंघावत आहे. वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली असल्याने शहरातील बाजारात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त परिणाम पालेभाज्यांवर होत असून दर नियंत्रणात नाही. येत्या काही दिवसांत दर अजून वाढण्यााची शक्यता व्यापारी मिनाझ बागवान  यांनी एकमतशी बोलताना सागीतले.
काकडी, शेवग्याची शंगा, मेथी, वांगे यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ५० ते ६० रूपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामिण भागासह शेजारील जिल्ह्यातून भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पण आता ही आवकच घटल्याने दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मागील पधरा दिवसात शहरातील बाजार समितीत भरपूर आवक झाली होती. मात्र गेला काही दिवसापासून शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवाकीत घट होत चालली आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
शहरातील किरकोळ  बारपेठेत वागें ५० रुपये  किलो, भेंडी ४० रुपये किलो, पत्ता कोबी ३५ रुपये  किलो, फुल  कोबी ४० रुपये  किलो, टमाटे ५० रुपये  किलो, गवार ५० रुपये  किलो, भोपळा ४० रुपये किलो, कोथिंबीर ३० ते ४० रुपये किलो,  हिरवी मिरची ५० रुपये किलो, वरणा ४० रुपये किलो,  शेवगा ५० रुपये किलो, मेथी १५ ते २० रुपये  पेंडी,  लिंबु १०० रुपये  किलो, काकडी ४० ते ५० रुपये  किलो दराने बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR