35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरपोलिसांनी साडेचार लाखांची  दारु पकडली पाच वाहने जप्त 

पोलिसांनी साडेचार लाखांची  दारु पकडली पाच वाहने जप्त 

लातूर : प्रतिनिधी
अवैध देशी-विदेशी दरुची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने रविवारी अहमदपूरात एकाचवेळी धाडी टाकल्या. यावेळी पाच वाहनांसह तब्बल ४ लाख ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल केले आहेत. अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना अहमदपूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक आणि विक्री केली जात आहे, अशी माहिती खब-याने दिली.
या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी आपल्या विशेष पथकांसह अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी धाडी टाकल्या.  ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या आदेशानुसार डीवायएसपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलिस नाईक तानाजी आरदवाड, राजकुमार डबेटवार, पाराजी पुढेवाड, बापूराव
धुळगंडे, रुपेश कज्जेवाड यांच्यासह केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR