30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयदेशभरात मुसळधार पावसाची शक्यता

देशभरात मुसळधार पावसाची शक्यता

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा मराठवाड्यात चक्रीवादळाची स्थिती

नवी दिल्ली/ पुणे : भारतीय हवामान खात्याने सोमवारी १० मे पर्यंत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मराठवाडा आणि परिसरात चक्रीवादळाची स्थिती आहे.

ईशान्य आसाम आणि बिहारमध्ये चक्राकार वा-यांबद्दल चेतावणी देत हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत तीव्र नैऋत्य वारे ७ मे २०२४ पर्यंत कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रचलित राहण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान खात्याने रविवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भारताच्या मोठ्या भागांना पंधरवड्याहून अधिक काळ वेठीस धरणारी अति उष्णता हळूहळू कमी होईल कारण पुढील आठवड्यात हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होईल.

विदर्भात हलक्या पावसाची शक्यता
७ मे रोजी पूर्व उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ती हळूहळू वाढेल. पूर्व आणि दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

पूर्वेकडून वारे वाहतात
रविवारी कमाल तापमान ३७ अंश तर किमान तापमान २४ अंश होते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. सकाळपासून दुपारपर्यंत पूर्वेकडून ताशी ३ किमी वेगाने वारे वाहत होते. मात्र, सायंकाळनंतर वा-याचा वेग ८ किमीपर्यंत वाढला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR